The Spice Lounge
 

मारुतीराव मिसळवाले

अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा स्वाद घेण्यासाठी 'मारुतीराव मिसाळवाले' मध्ये आपले स्वागत आहे. अहमदनगरमध्ये १९८३ साली 'श्री मारुतीराव शिंदे' यांनी खास खवय्यांसाठी या मिसळ सेंटरची सुरुवात केली. या वैशिष्ट्यपूर्ण चवीचा वारसा पुढे 'श्रीमती कमलबाई शिंदे' आणि त्यांचे नातू 'श्री राहुल खामकर' यांनी "मारुतीराव मिसळवाले" या नावाने नावारूपाला आणला. त्यांनी यास एक खास ब्रँड बनवत गुणवत्तायुक्त साहित्य आणि पारंपारिक खाद्य पदार्थ बनविणाऱ्या तज्ञांकडून बनविल्या जाणारी अस्सल चव खाद्यप्रेमींना उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने विविध शाखा स्थापन केल्या आहेत.

'मारुतीराव मिसळ' ची अहमदनगर मध्ये स्थापना झाल्यापासून सर्व लहान-थोर त्यांच्या चवीचे चाहते बनले आहेत. त्यांच्या चवीची लोकप्रियता पाहून झी २४ तास आणि प्रकाश कोल्हापुरी मसाले यांच्या वतीने आयोजित सर्वेक्षणातून मारुतीराव मिसळ यांना महाराष्ट्रातील अव्वल १० मिसळमध्ये 'अस्सल चव महाराष्ट्राची' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा दुर्मिळ सन्मान वैयक्तिरित्या श्रीमती कमलबाई शिंदे यांनी भव्य समारंभात स्वीकारला. यावेळी श्री राहुल खामकर यांनाही मनाचा फेटा बांधून गौरविण्यात आले.

आपला चवीचा वारसा विस्तारत मारुतीराव मिसाळवाले ची अद्यावत शाखा राहुल खामकर यांनी मुंबईतील सर्वात व्यस्त व्यवसाय केंद्र असलेल्या लोअर परळमध्ये सुरू केले आहे. मारुतीराव मिसळची नगरकरांनी चाखलेली चव आता मुंबईकरांनाही चाखायला मिळत आहे. त्यातही नवी म्हणजे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांसोबतच सर्व प्रकारचे स्नॅक व इतरही बरेचकाही खास पदार्थ खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.

त्यामुळेच महाराष्ट्रीयन पदार्थांचा मनमुराद आस्वाद घ्या. खा, अनुभवा व आनंद घ्या!

आमच्या आजोबांनी आणि आजीने १९८३ मध्ये मारुतीराव मिसळवाले या नावाने एस बी आय चौक येथे छोट्याश्या उपहार गृहाची सुरुवात केली. माझ्या आजी आजोबांना माझी आई एकुलती एक असल्या कारणाने आम्ही लहानपणापासून आजी आजोबासोबत जास्त असायचो. लहानपणापासून या मिसळ बनविण्याच्या पद्धती पाहत आलो आहोत. त्यामुळे या व्यवसायाशी आमचे विलक्षण नाते जोडले गेले आहे. २००१ सालानंतर आम्ही म्हणजे श्री. राहुल दत्तात्रय खामकर, श्री. अमित दत्तात्रय आमकर व श्री. अतुल दत्तात्रय खामकर या तिघा भावांनी मिळून हा वारसा पुढे चालवला आणि महाराष्ट्राच्या अनेक खमंग चाविंमध्ये मिसळपुरी्च्या आणखी एका खमंग चवीची भर घातली.

अशा प्रकारे पुढे २०११ साली आमच्या तिन्ही भावांच्या व परिवाराच्या मदतीने सावेडी आकाशवाणी केंद्रासमोर गाळा खरेदी करून तेथे अद्ययावत शाखेची सुरुवात केली. यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत आम्ही त्यात वाढ करत गेलो. लोकांची मागणी वाढत गेली. आम्ही २०१६ साली सर्वात जास्त रहदारीच्या मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये शाखा सुरु केली. त्यानंतर प्रवाश्यांना खास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर-पुणे हायवे लगत सुपा येथेही नवीन शाखेची सुरुवात केली.

प्रसिद्ध 'मारुतीराव मिसळवाले’ या खमंग चवीच्या सेवेला महाराष्ट्रात सर्वत्र गौरगिले आहे. 'झी २४ तास' टीव्ही आणि मे. ‘प्रकाश कोल्हापुरी मसाले’ यांच्याकडुन महाराष्ट्रात आयोजिलेल्या एका कार्यक्रमात 'अस्सल चव महाराष्ट्राची’ हा किताब आमच्या 'मारुतीराव मिसळवाले’ या सेवेला बहाल करण्यात आला. एका मोठ्या कार्यक्रमात ‘मारुतीराव मिसळवाले’ या सेवेच्या संस्थापिका ‘श्रीमती कमलबाई शिंदे’ यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच ‘श्री. राहुल खामकर’ यांना फेटा बांधून गौरविण्यात आले.

मिसळ पाव सगळीकडे मिळतो, पण मिसळ पुरी हि आमची खासियत आहे. गेल्या तीन दशकापासून आम्ही तिघे भाऊ श्री. राहुल खामकर, श्री.अमित खामकर व श्री. अतूल खामकर हे आपल्या वैयक्तिक मार्गदर्शनानाली सर्व पदार्थ जसे कि उत्तम फरसाण, उत्तम प्रतीचा गहू, मटकी, हळद, लालमिरची व सर्व प्रकारचे मसाले हे कटाक्षाने निरखून, पारखून घेतात. हेच आमच्या आजवरच्या यशाचे गमक आहे. आम्ही पारंपारिकेला जपत आमची गुणवत्ता वाढवत आहोत. त्यामुळे मिसळ बनविण्यासाठी पितळी भांडे वापरतो तसेच ग्राहकांच्या आरोग्याचीही काळजी घेतो.

The Spice Lounge


"स्वच्छता गुणवत्ता"



ग्राहकांचे समाधान हे आमचे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी घेणे हे आम्ही आमचे कर्तव्यच मानतो. त्यामुळे आमच्या सर्व शाखांमध्ये स्वच्छतेचे सर्व निकष काटेकोरपणे पाळले जातात. निवडक साहित्य व संपूर्ण स्वच्छ केलेला भाजीपाला यांचा वापर केला जातो. त्यामुळे आम्ही आमचा दर्जा टिकवला आहे. त्यामुळेच आमच्याकडे सहकुटुंब येऊन मिसळीचा स्वाद घेणारे असंख्य ग्राहक आहेत.


Marutirao Misalwale

आमच्याकडील रुचकर मिसळची चव चाखणारा बोलतो "अहाहा"... या चवीची दखल मीडियानेही घेतली आहे. आमची लज्जतदार चव खाणाऱ्याच्या नेहमी लक्षात राहते. आमच्या मारुतीराव मिसळवाले या आकर्षक मेनूच्या चवीची चर्चा आता फक्त अहमदनगर मध्ये नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील लोकांमध्येही होत असते. as:


 

फ्रँचायझी फॉर्म

खालील फॉर्म भरणे

 हेड ऑफिस : शॉप नं. - 2, साई पॅलेस ,आकाशवाणी केंद्राचा मागे ,
प्रोफेसर कॉलनी चौक ,सावेडी ,
अहमदनगर ,महाराष्ट्र 414003

 शिल्पा टावर, पांडुरंग बुधकर मार्ग,
लोवर परेल मागे, मुंबई, महाराष्ट्र ४०००१३

 नगर दौंड रोड, अहमदनगर
लवकरच येणार

 [email protected]


कॉन्टॅक्ट फॉर्म

तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता खालील फॉर्म भरून.

कंप्लेंट फॉर्म

The Spice Lounge
 

आमचे स्थान

आम्ही जाणतो कि आम्ही आपल्या जिभेवरून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहचू शकतो तर मग स्वतःला का थांबवायचे.


मुंबई

शिल्पा टावर, पांडुरंग बुधकर मार्ग,
लोवर परेल मागे, मुंबई, महाराष्ट्र ४०००१३

अहमदनगर

साई पॅलेस ,आकाशवाणी केंद्राचा मागे ,
प्रोफेसर कॉलनी चौक ,सावेडी ,
अहमदनगर ,महाराष्ट्र 414003

नगर दौंड रोड, अहमदनगर

लवकरच येणार
/

    Gallery Super-Sized